मालवण-देऊळवाडा येथील वीज समस्या मार्गी

मालवण-देऊळवाडा येथील वीज समस्या मार्गी

Published on

31401

मालवण-देऊळवाडातील
वीज समस्या अखेर मार्गी

‘थ्री-फेज’ वीज वाहिनीमुळे आधार

मालवण, ता. १७ : शहरातील देऊळवाडा-आडारी रोड परिसरात वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या भागात ‘थ्री-फेज’ वीज वाहिनी बसवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली होती. महावितरण कंपनीने या मागणीची दखल घेत परिसरात थ्री-फेज लाईन बसविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
देऊळवाडा-आडारी रोड भागात वीजपुरवठा सतत खंडित होणे आणि व्होल्टेज कमी असल्याने घरातील विद्युत उपकरणे जळून खाक होण्याचे प्रकार घडत होते. या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी उमेश चव्हाण, राजू किर, श्याम आजगावकर, विशाल आजगावकर, स्वप्नील मालवणकर, अमित बोर्डवेकर, भूषण मुंबरकर, बाळू दाभोलकर आदी नागरिकांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महावितरण कंपनीला निवेदन दिले होते.
महावितरणने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन थ्री-फेज लाईन बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. यामुळे या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून, नागरिकांनी महावितरणच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com