भडगाव बुद्रूक येथे
संगणक प्रशिक्षण

भडगाव बुद्रूक येथे संगणक प्रशिक्षण

Published on

भडगाव बुद्रुक येथे
संगणक प्रशिक्षण
पणदूर ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास मंडळ तसेच भडगाव बुद्रुक ग्रुप ग्रा.पं.तर्फे सह्याद्री माध्यमिक विद्यालय (भडगाव बुद्रुक) येथे संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रारंभ केला. कार्यशाळेचे आयोजन आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केले असून प्रशिक्षण सलग आठ दिवस चालणार आहे. कोकण कला व शिक्षण विकास मंडळाचे समीर शिर्के व संगणक प्रशिक्षक स्वप्नील नाईक उपस्थित होते. भडगाव बुद्रुकचे उपसरपंच राजेंद्र राणे व सदस्य प्रीतेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संभाजी वळंजू, संचालक मधुकर पवार, मुख्याध्यापक सचिन धुरी, ज्येष्ठ शिक्षक वारंग, सहायक शिक्षिका श्रीमती बांदेकर, श्रीमती राऊत, श्रीमती परब, लिपिक राजेंद्र सावंत व शिक्षकेतर कर्माचारी बावदाणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
न्हावेलीत २० ला
समर्थ प्रकट दिन
मळेवाड ः न्हावेली-विवरवाडी गणपती मंदिर येथे शुक्रवारी (ता.२०) अक्कलकोट निवासी सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ पादुका स्वामी समर्थ प्रकट दिन दत्तयाग होणार आहे. सकाळी ७.३० वाजता अभिषेक, ९.३० वाजता दत्तयाग, दुपारी १.३० वाजता आरती, २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी नामस्मरण, ६ वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता अमृताभिषेक साटेली निर्मित श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अभंग, नाट्यगीत, भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. यात गायक सत्यनारायण कळंगुटकर, हर्षल मेस्री, गायिका समृद्धी सावंत, हार्मोनियम साहिल घुबे, पखवाज आकाश साळगावकर यांचे आहे. लाभ घेण्याचे आवाहन राजन कालवणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com