-जि.प.अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांचा मंडणगडात सत्कार
rat१७p१४.jpg -
P२६O३१४४१
मंडणगड : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांचा मंडणगड शिवसेनेच्यावतीने सत्कार करताना सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर व कार्यकर्ते.
-------
मंडणगडच्या लेकीकडे जिल्ह्याची धुरा
अस्मिता केंद्रे यांच्या निवडीचा स्वागत, सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ३४व्या अध्यक्षा म्हणून नुकत्याच निवड झालेल्या अस्मिता केंद्रे यांचे मंडणगड तालुक्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे मंडणगड तालुक्याला प्रथमच जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.
मंडणगड पंचायत समिती येथील राजमाता जिजाऊ सभागृहात आज स्वागत व सत्कार झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, माजी सभापती अनंत लाखण, भाई पोस्टुरे, रामदास रेवाळे, सुलतान मुकादम, नितीन म्हामुणकर, शिवसेना विभागप्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, वासीम चिपोलकर, सिद्धेश देशपांडे, चेतन सातोपे, आनंद भाटे, विकास पवार, नीलेश महाडीक, संतोष पार्टे, नीलेश रक्ते, हरिश्चंद्र कोदेरे, सतीश दिवेकर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रे म्हणाल्या, पक्षनेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मंडणगड तालुक्याला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली असून, हा संपूर्ण तालुक्याचा सन्मान आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू तसेच महिला, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि मच्छीमार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी या पदाचा उपयोग करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

