लोक अदालतीत ३,९१८ प्रकरणात तडजोड

लोक अदालतीत ३,९१८ प्रकरणात तडजोड

Published on

लोकअदालतीत विक्रमी तडजोडी
जिल्हा विधी प्राधिकरण ; ७ कोटी ५२ लाखांची वसुली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ः जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालयात झालेल्या पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित ४ हजार १८४ प्रकरणे आणि वाद दाखलपूर्व १७ हजार ९६३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३ हजार ९१८ प्रकरणामध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले आहेत. एकूण ७ कोटी ५२ लाख २४ हजार ५४५ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारण, दिल्ली सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‍घाटन झाले आहे. या लोकअदालतीला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून ४ हजार ६८६ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १६ हजार ९५९ वाद दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. एकूण ४ हजार ७३७ प्रकरणामध्ये ८ कोटी ४५ लाख ८२ हजार ७७३ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. या लोकअदालतीत वकीलवर्ग व पक्षकार यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधित खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे नगरपालिका, ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बॅंका, पतसंस्था, थकीत वीजबिले, टेलिफोनची थकीत बिले आदी प्रकरणांची तडजोड झाली. हे लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव आर. आर. पाटील व कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Marathi News Esakal
www.esakal.com