राजापूर शहराला मिळाले 1 कोटी 40 लाख
राजापूर शहराला १ कोटी ४० लाख
संजय ओगले ः विविध विकासकामांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ : राजापूर नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र. ९ मधील विविध विकासकामांना शासनाच्या नगरोत्थान व नागरी सुविधांतर्गत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ही कामे सुरू होतील, असे माजी नगरसेवक संजय ओगले यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी आमदार सामंत यांच्यामार्फत पालकमंत्री सामंत यांच्याकडे विकासकामांची यादी दिली होती. ती मंजूर झाली आहे. त्यामुळे या भागातील विकासाला आता गती मिळणार असल्याचे ओगले यांनी सांगितले. दिवटेवाडी येथील राजेश मुळम यांच्या घराजवळ चिरेबंदी भिंत बांधणे ५ लाख, दिवटेवाडी कुळी घर ते रामा पिठलेकर घर रस्ता रुंदीकरण करून संरक्षण भिंत बांधणे २० लाख, प्रभाग क्र. ८ मधील कोंडसकर घर ते चव्हाटा आणि मराठे घर दिवटेवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे ९ लाख ९७ हजार, कुंभारमळा ते नदीपात्रापर्यंत संरक्षक भिंत बांधणे १९ लाख १५ हजार, दिवटेवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता रुंदीकरण करणे १० लाख ४६ हजार, दिवटेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत बांधणे ९ लाख ७३ हजार, गुजराळी येथे कलावती आई मंदिर येथे रस्ता रुंदीकरण करून संरक्षक भिंत बांधणे ९ लाख ९२ हजार, कलावती आई मंदिर येथे सोलर हायमास्ट बसवणे ७ लाख, गोंडाळ चौक येथे सुशोभीकरण करणे ४ लाख ९८ हजार, लक्ष्मीनारायण मंदिर येथे सोलर हायमास्ट बसवणे ७ लाख, बागकाझी कब्रस्तान सुशोभीकरण करणे १९ लाख ९५ हजार, तांबळघाटी ते नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ९ लाख ७९ हजार, श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर गुजराळी वहाळावर आरसीसी पूल बांधणे ११ लाख ६९ हजार, कोठारकर तिठ्यावर सोलर हायमास्ट बसवणे ७ लाख ४२ हजार असा निधी प्राप्त झाला आहे.

