-ग्राहक देवो भव ही केवळ घोषणा

-ग्राहक देवो भव ही केवळ घोषणा

Published on

एमआरपी पुरेसे
नाही : देशमुख
खेड : जोपर्यंत एमआरपीसोबत उत्पादन खर्च सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत खरी ग्राहक संरक्षण व्यवस्था अस्तित्वात येणार नाही तसेच वस्तूंवर अवास्तव एमआरपी छापून ग्राहकांप्रति कर्तव्य पूर्ण झाले, असे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे ग्राहकदेवो भव ही घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही, असे प्रतिपादन येथील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचे निरीक्षण अधिकारी ए. बी. देशमुख यांनी केले. तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या खेड शाखेतर्फे आयोजित जागतिक ग्राहकदिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पुरवठा निरीक्षक आर. आर. ढवळ, महसूल साहाय्यक एन. बी. काळबोंडे, खेड ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष विजय येरूणकर, सदस्य योगेश डेरवणकर, अक्षय मोरे, दिवाकर प्रभू, प्रसाद मोडसिंग, जयेश कदम, महसूल साहाय्यक एस. एस. यादव, डी. ए. चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com