गावखडीतील मठात १९ पासून स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव

गावखडीतील मठात १९ पासून स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव

Published on

स्वामी समर्थ प्रकट
दिन उत्सव उद्यापासून
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ मार्च या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. १९ मार्चला सायंकाळी ५.३० वा. मठात ‘स्वामीनाम ज्योत’ प्रज्वलन करून उत्सवाचा प्रारंभ होईल. २०ला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पहाटे ५.३० वा. काकडा आरती, सकाळी ७ वा. स्वामी समर्थ पूजन आणि स्वामींच्या पादुकांवर अभिषेक, १० वा. सामुदायिक नामजप, १०.३० वा. श्री स्वामी नामजप यज्ञ, दुपारी १२ वा. सद्‍गुरू प्रवचन, १२.३० वा. महानैवेद्य अर्पण आणि महाआरती, १ वा. महाप्रसाद वितरण, ७ वा. मठाच्या प्रांगणात पालखी प्रदक्षिणा होईल. ८ वा. नित्याची आरती, २१ मार्चला दुपारी १२ वा. महानैवेद्य, महाआरती आणि महाप्रसाद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com