म्हापण येथे शनिवारपासून द्विवार्षिक उत्सव सोहळा
म्हापण येथे शनिवारपासून
द्विवार्षिक उत्सव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १८ ः वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण-खालचीवाडी (विठ्ठल मंदिर स्टॉप नजीक) येथील श्री देव ब्राह्मण देवस्थान, कोनकरवाडी यांचा द्विवार्षिक उत्सव सोहळा येत्या शनिवार (ता. २१) ते सोमवार (ता. २३) या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी (ता. २१) सकाळी ११ ते १२.३० या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा, गाऱ्हाणे, महाआरती आणि महानैवेद्य, दुपारी १ ते ३.३० दरम्यान, भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३.३० पासून विविध भजनांच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. यात श्री देव ब्राह्मण प्रासादिक महिला भजन मंडळ, आडेली (बुवा वैशाली कोंडसकर), सायंकाळी ५ वाजता श्री सिद्धिविनायक भजन मंडळ, कुडाळ, ६.३० वाजता महापुरुष भजन मंडळ, निवती यांची भजने होतील. रात्री ८ वाजता किंजवडे-देवगड येथील श्री आई पावणादेवी समई नृत्याचा विशेष कार्यक्रम, १०.३० वाजता श्री आई भगवती कला दिंडी भजन मंडळ, तोरसोळे-देवगड (बुवा संजय परब) यांचा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. २२) दुपारी २.३० ते ५ या वेळेत महिलांसाठी खास ''खेळ पैठणीचा'' हा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ८ दरम्यान सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांचा ''भक्तांची पाठीराखी आदिमाया'' हा पौराणिक नाट्यप्रयोग, रात्री ९ ते १२.३० पर्यंत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा पौराणिक नाट्यप्रयोग, उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. २३) सायंकाळी ४ ते रात्री ८ दरम्यान स्थानिक महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ ते १२.३० या वेळेत खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली (वेंगुर्ले) यांचा पौराणिक नाट्यप्रयोग (सौजन्य ः नवनाथ बांदेकर, अरविंद ठाकूर आणि कोनकर कुटुंबीय- दयानंद, सूर्यप्रकाश, मुरलीधर, दत्ताराम, विराज, सतीश, सत्यविजय, संदेश, भूपेंद्र व विश्वनाथ कोनकर) सादर होईल. या द्विवार्षिक उत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद, महाप्रसाद व सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव ब्राह्मण देवस्थान, कोनकरवाडी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

