विंधन विहीर, रस्ताकामाचे
म्हापण मळई येथे भूमिपूजन

विंधन विहीर, रस्ताकामाचे म्हापण मळई येथे भूमिपूजन

Published on

31747

विंधन विहीर, रस्ताकामाचे
म्हापण मळई येथे भूमिपूजन

म्हापण, ता. १७ ः म्हापण मळई पूर्ण प्राथमिक शाळा येथे शासकीय जागेत विंधन विहीर तसेच म्हापण मळई ते खवणे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे या आमदार निधीतून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १७) शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही कामे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आली.
या कामांचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. ​यावेळी वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, पंचायत समिती गटनेते विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, कोचरा सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापण शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगावकर, म्हापण माजी सरपंच व सोसायटी चेअरमन आनंद गावडे, म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ, सदस्य सिया मार्गी, शिवसेना शाखाप्रमुख भाई खवणेकर, भाजप बूथ अध्यक्ष प्रदीप गवंडे, सिद्धेश मार्गी आदी उपस्थित होते. रघुनाथ जुवाटकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com