टेरवमध्ये शिमगोत्सवाची उत्साहात सांगता

टेरवमध्ये शिमगोत्सवाची उत्साहात सांगता

Published on

शिमगोत्सवाची
टेरवमध्ये सांगता
चिपळूण : टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी-वाघजाई देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हुताशनी पौर्णिमेनिमित्त ग्रामस्थांनी होळी प्रज्वलित केली. ३ मार्चला पारंपरिक विधीनुसार होमपूजन व पालखी सोहळा पार पडला. पहाटे ढोल-ताशांच्या गजरात पालखीची प्रदक्षिणा घालून होम प्रज्वलित करण्यात आला व भाविकांना दर्शन देण्यात आले. सुवासिनींनी ओट्या भरून पूजा केली. रात्री पालखीचा छबिना विविध वाड्यांतून वाजतगाजत काढण्यात आला. विद्युत रोषणाई, रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण उत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com