बांद्यातील विकासकामांना
प्राधान्यक्रमाने न्याय देऊ

बांद्यातील विकासकामांना प्राधान्यक्रमाने न्याय देऊ

Published on

31806

बांद्यातील विकासकामांना
प्राधान्यक्रमाने न्याय देऊ

कामत; ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः बांदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य प्रमोद कामत यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत, आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, देवल येडवे, रुपाली शिरसाट, वाफोली उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच दीपक सावंत, राजा सावंत, ग्रामविकास अधिकारी आदम शहा आदी उपस्थित होते. सभापती सुस्मिता जाधव यांचा सरपंच नाईक यांच्या हस्ते तर उपसभापती मुळीक यांचा जावेद खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. कामत यांनी, बांदा गावात सत्कार होणे, ही माझ्यासाठी ऊर्जा देणारी बाब आहे. गावातील विकासकामांना न्याय देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन, असे अभिवचन दिले. बीडीओ वासुदेव नाईक यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती कविटकर यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच प्रियांका नाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com