एचपीव्हीपासून मुलींना वंचित ठेऊ नये
‘एचपीव्ही’पासून
‘मुलींनावंचित ठेवू नये’
गुहागर ः लाडक्या मुलींना एचपीव्ही लसीकरणापासून वंचित ठेवू नये. नजीकच्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्यकेंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे. अफवांवर विश्वास न ठेवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शंका निरसन करून घ्या, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी केले आहे. लसीकरणामुळे मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. हा अत्यंत महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका व आशा आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती करून पात्र मुलींची याद्या तयार करून १४ वर्ष पूर्ण झालेल्या; परंतु १५ वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींच्या लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे पालकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याने तालुक्यातील लसीकरण मोहीम राबवण्यात अडचणी येत आहे. खासगी दवाखान्यात या लसीकरणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरणाचा लाभ तालुक्यातील पालकांनी आपल्या लाडक्या मुलींसाठी घ्या, असे आवाहन डॉ. जांगीड यांनी केले आहे.
विठ्ठल मंदिरात आज
स्वामी समर्थ प्रकटदिन
रत्नागिरी : शहरातील विठ्ठल मंदिर आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवारी (ता. २०) श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वा. स्वामींची पूजा होणार आहे. ८.३० पासून स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार आहे. ३ वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जाईल. ३ ते ७ या वेळेत विविध भजने, अभंग गायन अशी सेवा केली जाणार आहे. सायंकाळी ७.३० वा. आरती होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. सर्व स्वामीभक्तांनी शुक्रवारी स्वामींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ भक्तमंडळ, श्री विठ्ठल मंदिर संस्था यांच्याकडून करण्यात आले आहे.
आसूद येथे आज
स्वामी समर्थ प्रकटदिन
दापोली : तालुक्यातील आसूद येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त शुक्रवारी (ता. २०) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत श्रींच्या पादुकांची पूजा व लघुरूद्र होणार आहे. त्यानंतर १०.३० ते १२.३० या वेळेत होमहवन, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत श्रींचा महाप्रसाद होणार असून, ४ ते ६ या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत दुर्गादेवी महिला भजन मंडळाचे भजन होईल. ७ वाजता श्रींची आरती व मंत्रपुष्प, रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत देवीदास दातार व सहकारी यांची संगीतसेवा होणार आहे. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन मठातर्फे वैभव जोशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

