बेर्डेवाडी धरणाच्या डाव्या कालव्याला नवसंजीवनी
-rat१९p२.jpg-
P26O31902
लांजा ः वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पातील डावा कालवा.
------
ग्राऊंड रिपोर्ट...........लोगो
बेर्डेवाडी धरणाच्या डाव्या कालव्यास नवसंजीवनी
बंदिस्त वितरण प्रणालीसाठी चार कोटी; सुमारे ५२२ हेक्टर येणार सिंचनाखाली
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या बंदिस्त वितरण प्रणालीसाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कालव्यामुळे परिसरातील सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षानंतर बेर्डेवाडी धरणाच्या डाव्या कालव्याला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली आहे. या धरणातील जलसाठ्यासह कालव्यांमधील पाण्याच्या साहाय्याने धरण अन् कालव्याचा परिसर सुजलाम् सुफलाम् होणार आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
-------
वेरवली बुद्रुक परिसर सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या या धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. धरणाची उभारणी झाली; मात्र, धरण नजीक असूनही गावातील काही वाड्यांना पाणीटंचाईच्या झळांना सामोरे जावे लागत होते. वेरवली बुद्रुक येथील टंचाईग्रस्त वाड्यांमधील नागरिकांची वर्षानुवर्षाची पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार किरण सामंत यांनी पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला. त्यांच्या या सूचनेनुसार, गतवर्षी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तब्बल ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वेरवली बुद्रुक गावातील वाड्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले.
-----
*पाणी पाच किमीपर्यंत नेण्यात यश
बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या खुल्या पद्धतीने असलेल्या सुमारे सहा किमी डाव्या कालव्याचे काम २०१६ मध्ये पूर्ण झाले; मात्र, कालवा अस्तरीकरण विरहित असल्याने दोन किमीपर्यंत पाणी जात होते. त्याची लांबी वाढवल्यास पाणी वाहून नेण्याच्यादृष्टीने आणि लोकोपयोगीच्यादृष्टीने अधिक फायदा होणार होता. ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने या कालव्याची डागडुजी केली आणि कालव्याची लांबी वाढवताना पाणी पाच किमीपर्यंत नेण्यात यश आले.
--
*बंदिस्त नलिका प्रणालीची मागणी
डाव्या कालव्याच्या डागडुजीमुळे पाच किमी अंतरापर्यंत पाणी पोहोचण्यात यश आले असले तरी अस्तरीकरण विरहित कालव्यामुळे कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून शेतीचे नुकसान होत होते. त्याचवेळी, पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासही अडचणी येत होत्या. त्यामुळे ० ते ६ किमी डावा कालवा बंदिस्त नलिका प्रणालीमध्ये करण्याची आग्रही मागणी वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांकडून केली जात होती. ग्रामस्थांची ही मागणी गेल्या चार वर्षापासून दुर्लक्षित होती.
---
*चार वर्षानंतर यश
वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या मागणीची दखल कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार करून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डाव्या कालव्याची बंदिस्त नलिका प्रणालीमध्ये पुनर्स्थापना करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने चार कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यातून, लोकांच्या मागणीप्रमाणे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम आता मार्गी लागणार आहे. या कामामुळे डाव्या कालव्याचे सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्याद्वारे शेतीतून अधिक समृद्धी मिळण्याला बळ मिळणार आहे.
----
*पाणी सोडणार उजव्या कालव्यातून
उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत विमोचक दुरुस्तीसाठी केंद्रीय जलऊर्जा संशोधन केंद्राकडून आवश्यक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे उजवा कालवा पाणी सोडण्याबाबत विमोचक दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे डाव्या कालव्याप्रमाणे उजवा कालव्यातूनही बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे पाणी सोडले जाणार आहे.
----
*धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण
वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी येथे लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत स्थानिक नदीवर बांधण्यात आलेले धरण हे मातीचे असून, त्यामुळे परिसरातील शेतीसाठी सिंचनाची सोय झाली आहे. त्याचवेळी वेरवलीसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यावर हे पाणी सुमारे २५ फूट उंचावरून कोसळत असल्याने त्याला धबधब्याचे रूप प्राप्त होते. फेसाळत पांढऱ्या शुभ्रजलधारांनी कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
-----
चौकट
दृष्टिक्षेपात
वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प ः
धरणाचे स्वरूप ः मातीचे धरण
धरणाची लांबी ः ६०८.५० मीटर
धरणाची उंची ः ५५.३६ मीटर
पाणीसाठवण क्षमता ः २१,६८ दशलक्ष घनमीटर
सिंचनक्षेत्र ः १०८१ हेक्टर
---
कोट
वेरवली येथील बेर्डेवाडी धरणाचे गेली चार वर्षे कालव्याचे थांबलेले काम आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा करून मार्गस्थ लावले आहे. या कालव्याच्या कामामुळे येथील परिसरात मुबलक पाणी मिळणार आहे.
- प्रकाश गुरव, ग्रामस्थ, वेरवली बुद्रुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

