कोकणातील शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान द्या
शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान द्या ः आमदार निकम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः कोकणातील शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी फळपिकांना प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठातील (दापोली) रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली. तसे झाल्यास संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असे त्यांचे मत आहे.
महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात कोकणच्या प्रश्नांवर झालेल्या अल्पकालीन चर्चेत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भूमिका मांडली. नियम १०१ अन्वये झालेल्या या चर्चेत त्यांनी शेती, उद्योग, पर्यटन आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर शासनाचे लक्ष वेधून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस मागण्या केल्या. कोकणातील काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी आमदार निकम यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात काजू बोंडापासून अल्कोहोल निर्मितीस परवानगी देणारे विशेष धोरण तयार करावे, फळपिकांपासून वाईन निर्मितीला चालना द्या, काजू बी आयात धोरणाचा पुनर्विचार करून स्थानिक काजू बी ला योग्य भाव मिळवून द्यावा या मागण्यांचा समावेश आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्याचे रूपांतर उत्पन्नात करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यावर त्यांनी भर दिला. तसेच बांबू लागवड आणि त्या संबंधित उद्योगांना शासनाने विशेष सवलती देऊन प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
तसेच हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन (GI) आणि पेटंट केवळ कोकणापुरतेच मर्यादित राहावे, यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

