चिपळुणातील स्मशानभूमीची पाहाणी

चिपळुणातील स्मशानभूमीची पाहाणी

Published on

चिपळुणातील ख्रिश्चन
स्मशानभूमीची पाहणी
चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीची स्वच्छता व संरक्षक भिंत उभारण्याबाबत मागणी होत असताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित विभागाला स्मशानभूमी परिसर तातडीने स्वच्छ करणे, कंपाउंड वॉल उभारणे तसेच आवश्यक तेथे भराव करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, नगरसेवक उदय जुवळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

परिवहन निवृत्त
कर्मचाऱ्यांची सभा
देवरूख ः राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा प्रसन्न ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संघटनेचे सचिव प्रकाश जाधव यांनी सभेचे इतिवृत्त वाचन केले आणि त्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या कामाचे सभासदांनी कौतुक केले. वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच केशव नार्वेकर यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. दिलीप जाधव, दिलीप गोखले यांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना अल्पोपाहार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com