चिपळूण ः शहरात पारंपरिक वातावरणात शोभायात्रा

चिपळूण ः शहरात पारंपरिक वातावरणात शोभायात्रा

Published on

rat20p7.jpg-
32157
चिपळूण ः गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेली शोभायात्रा.

चिपळूण शहरात पारंपरिक
वातावरणात शोभायात्रा
चिपळूण, ता. २० : गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागतानिमित्त चिपळूण शहरात स्वागतयात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
चिपळूण हे शहर संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वयोवृद्धांसह तरुणाई मोठ्या उत्साहाने शोभायात्रेत सहभागी होऊन पाडव्याची रंगत वाढवत होती. या निमित्ताने “नववर्षाची सुरवात संस्कृती जपत करूया” हा संदेश देत शोभायात्रा आयोजित करण्यात आली. ही शोभायात्रा सायंकाळी साडेपाच वाजता कालभैरव मंदिर परिसरातून प्रारंभ झाली. यात्रेत लेझिम पथके, सांस्कृतिक देखावे तसेच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवणारे चित्ररथ सहभागी झाले होते. त्यामुळे ही शोभायात्रा केवळ मिरवणूक न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाची, एकात्मतेची आणि परंपरेच्या जतनाचा संदेश देणारी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com