वैभववाडीत पालखी नृत्य, 
वारकरी दिंडीही लक्षवेधी

वैभववाडीत पालखी नृत्य, वारकरी दिंडीही लक्षवेधी

Published on

32187

वैभववाडीत पालखी नृत्य,
वारकरी दिंडीही लक्षवेधी

मराठी नववर्षाचे शोभायात्रेद्वारे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २० ः येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने मराठी नववर्षानिमित्त गुरुवारी (ता.१९) सायकांळी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात पालखी नृत्य, वारकरी दिंडी आणि चिमकुल्यांचे लेझीम नृत्य लक्षवेधी ठरले. या शोभायात्रेत शेकडो मराठी बांधव सहभागी झाले.
येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मराठी नववर्ष स्वागतासाठी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते. यावर्षी देखील गुरुवारी सायंकाळी ५ वाजता या शोभायात्रेला येथील दत्त मंदिरापासून सुरूवात झाली. वारकरी दिंडी, लेझीम पथक, पालखी नृत्य आणि ढोलपथकांसह शेकडो मराठी बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले. दत्त मंदिरापासून ही शोभायात्रा संभाजी चौकापर्यंत काढण्यात आली. संभाजी चौकात सुरुवातीला वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली गजरात पांरपरिक पध्दतीने फेर धरला. त्यानंतर शेर्पे येथील पालखी नृत्याने उपस्थित सर्वांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने देखील सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. या शोभायात्रेचा शुभांरभ विनोद महाराज पाटील यांच्या हस्ते झाला. नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, बांधकाम सभापती रणजित तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, दीपक माईणकर, माजी नगरसेवक संतोष माईणकर, राकेश कुडतरकर, अवधूत माईणकर, सचिन माईणकर, संकेत माईणकर, अमेय पोरे, नीतेश पाटील, सागर माईणकर, आकाश कानडे, रोहित माईणकर आदी सहभागी झाले.

Marathi News Esakal
www.esakal.com