रत्नागिरी- पर्यावरण संवर्धनाची चळवळ होईल प्रभावी
rat20p2.jpg-
32132
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ उपपरिसरात आयोजित पर्यावरण कार्यशाळेत बोलताना नंदकुमार पटवर्धन. डावीकडून अभिनंदन बोरगावे, डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. प्रफुल्ल सावंत, डॉ. सोनाली शिंदे.
----------
लोकसहभागाने पर्यावरण संवर्धन चळवळ होईल प्रभावी
नंदकुमार पटवर्धन; विद्यापीठ उपपरिसरात पर्यावरणावर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी करता येईल. सरकारी व खासगी क्षेत्रात पर्यावरण सल्लागार, प्रदूषण नियंत्रण, वनीकरण, जलसंधारण, जैवविविधता संवर्धन, हवामान बदल संशोधन अशा अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले.
मुंबई विद्यापिठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पर्यावरणशास्त्र विभागातर्फे पर्यावरणीय दृष्टिकोन : शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांचा समन्वित संवाद यावर कार्यशाळा झाली. या वेळी आसमंत फाउंडेशनचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल सावंत, आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथील जैवविविधता व पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली शिंदे, रत्नागिरी उपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी व सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे उपस्थित होते. सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
ऊर्जाक्षेत्रातील शाश्वत उपाय यावर आशुतोष शेवपुरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, स्वच्छ व सुरक्षित ऊर्जानिर्मिती ही भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. डॉ. प्रफुल्ल सावंत म्हणाले, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रत्यक्ष कौशल्ये, इंटर्नशिप आणि प्रात्यक्षिक अनुभव यांना प्राधान्य द्यावे. औद्योगिक सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत माहिती देताना प्रभाकर सडेकर म्हणाले, योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण नियंत्रण शक्य आहे.
चौकट १
शैक्षणिक मूल्य, संस्कारांची सांगड हवी ः दीपक गद्रे
उद्योजक दीपक गद्रे म्हणाले की, औद्योगिक प्रगती करताना शैक्षणिक मूल्य व संस्कार यांची सांगड घालून शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, शिस्त व सामाजिक जबाबदारी या बाबी दैनंदिन जीवनात आचरण करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना. विद्यार्थ्यांनी नवीन कल्पनांना चालना देऊन, जोखीम स्वीकारून आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

