पाडलोस शाळेने प्रगतीचा पाया रचला
32208
पाडलोस शाळेने प्रगतीचा पाया रचला
कृष्णा करमळकर ः शतकमहोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः पाडलोस गावातील शिक्षणाची मुहूर्तमेढ एका साध्या शेतमांगरातून रोवली आणि पुढे याच बीजाचे भव्य वटवृक्षात रुपांतर झाले, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर यांनी केले.
भविष्यातील शिक्षणाची गरज ओळखून १८ मार्च १९२६ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडलोस क्र. १ ची स्थापना झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ शाळेच्या शतकमहोत्सव सोहळ्याचे उद्घाटन उत्साहात झाले. यावेळी श्री. करमळकर बोलत होते. या सोहळ्यास उपसरपंच राजू शेटकर, तुकाराम गावडे, देवस्थान मानकरी आनंद गावडे, पाडलोस गाव ग्रुप अध्यक्ष प्रणित गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, उपाध्यक्ष सुधीर गावडे, शाळा क्र. २ च्या अध्यक्ष मयुरी कुबल, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, माजी उपसरपंच महादेव गावडे, शिक्षक अनिल वरक तसेच रामचंद्र गावडे, नाना गावडे, गोविंद माधव, बंडो माधव आदी उपस्थित होते. शतकमहोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार असून, हा सोहळा गावासाठी अभिमानाचा ठरणार आहे, असे माजी विद्यार्थी विश्राम गावडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. शंभर वर्षांपासून गावोगावी ज्ञानाची गंगा पोहोचवणाऱ्या या शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. मुख्याध्यापक विजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर यांनी प्रास्ताविक केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे यांनी आभार मानले.
.....................
शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती
त्या काळातील अडचणी व गावकऱ्यांची शिक्षणाविषयीची तळमळ अधोरेखित करण्यात आली. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून सुरू झालेली ही शाळा आज आधुनिकतेकडे वाटचाल करत असून, शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने प्रगती करत आहे, असे तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

