कुडाळात आजपासून ‘सिंधुदुर्ग सरस’

कुडाळात आजपासून ‘सिंधुदुर्ग सरस’

Published on

32225

कुडाळात आजपासून ‘सिंधुदुर्ग सरस’

जिल्हा परिषदेचे आयोजन; सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६’चे आयोजन कुडाळ हायस्कूल मैदानावर शनिवार (ता. २१) ते बुधवार (ता. २५) या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील बचतगटांचे ७५ स्टॉल्स सहभागी झाले असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, रुपेश पावसकर, नागेश आईर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, अमित भोगले, श्री. म्हाडेश्वर, अर्चना घावनळकर, ‘उमेद’चे तालुका समन्वयक गणेश राठोड आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्‍घाटन खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार नीलेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात जिल्हाभरातील महिला बचतगटांकडून विविध खाद्यपदार्थ, काजू, आंबा, मसाले, हातमाग उत्पादने तसेच इतर ग्रामीण उत्पादनांचे ७५ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश आहे.
-----
होणारे विविध कार्यक्रम असे
शनिवारी (ता. २१) बचतगट महिलांसाठी विविध स्पर्धा, सायंकाळी समूहनृत्य सादर होणार आहे. रविवारी (ता. २२) कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीविषयक शिबिरे आणि पारंपरिक खेळ, सोमवारी (ता. २३) बँकिंग व ग्रामपंचायत विषयक कार्यशाळा, महिला गट नृत्य स्पर्धा, रात्री पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग, मंगळवारी (ता. २४) महिला व बाल विकास आणि आरोग्य विषयक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवारी (ता. २५) बक्षीस वितरण, आढावा बैठक आणि महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com