कणकवली शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
32228
कणकवली शहरात सांस्कृतिक
कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली, ता. २० : येथील शहर विकास आघाडीतर्फे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांचा वाढदिवस आणि गुढीपाडवा सणानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील या कार्यक्रमांचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी श्रीफळ वाढवून केला.
यावेळी मोरेश्वर मित्र मंडळ, नेरूळ वाघचौडी (कुडाळ) यांच्या ‘राधानृत्य रोंबाट’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तसेच विविध मंडळांची भजनेही झाली. या कार्यक्रमावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर, सत्यजित पारकर, सौरभ पारकर, नितीन मुरकर, वैभव मालंडकर तसेच ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

