प्रतीक्षा संपली जिल्ह्यात आज रमजान ईद
प्रतीक्षा संपली जिल्ह्यात
आज रमजान ईद
चिपळूण, ता. २० : शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन घडताच ‘चाँद नजर आ गया, ईद मुबारक’ असे म्हणत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. किरकोळ खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळलेली दिसून आली. सायंकाळपासून चंद्रदर्शनाकडे मुस्लिम बांधवांच्या नजरा लागून होत्या. ईदनिमित्त प्रमुख बाजारपेठेत कपडे आणि अन्य साहित्याचे स्टॉल्स सजले असून, खरेदीसाठी दिवसभर मुस्लिम बांधवांची गर्दी झाली होती.
गेली महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करत आहेत. पाच वर्षापासून पुढील लहान मुलेही उपवास करत होते. या निमित्ताने महिनाभर विविध प्रकारची धार्मिक कार्ये, दानधर्म करण्यात येत होते. आठवडाभर ईदसाठी शहरातील बाजारपेठ सज्ज आहे. मशिन आणि ईदगाहची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई केली आहे.
शनिवारी सकाळी साडेसात ते नऊच्यादरम्यान ईदची नमाज पठण केली जाईल. ईदच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करणे तसेच अत्तर आणि सुरमा लावणे या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. ईदसाठी तयार होणाऱ्या शिरखुर्म्यासाठी सुकामेवा, शेवया व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ईदच्या दिवशी कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक मुस्लिम मोहल्ल्यात पोलिस आणि होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिपळूण सावर्डे आणि शिरगाव पोलिसात शांतता कमिटीची बैठक घेऊन पोलिसांनी सर्वांना गुढीपाडवा आणि ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

