शिवाजी विद्यापीठ चर्चासत्र

शिवाजी विद्यापीठ चर्चासत्र

Published on

जीएसटी सुधारणांबाबत
सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्र
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातर्फे आयोजन
कोल्हापूर, ता. २० : शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातर्फे सोमवार (ता.२३) पासून दोन दिवसीय ''जीएसटी'' (वस्तू आणि सेवा कर) याविषयी राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.
चर्चासत्रात ‘जीएसटी सुधारणा, त्याचे परिणाम आणि विकसित भारत २०४७’ यावर जीएसटी क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. वस्तू व सेवा कराचे आयुक्त सुरेंद्र मानकोस्कर यांच्यासह धारवाडचे प्रा. पांडुरंगा चर्चासत्राचे मुख्य मार्गदर्शक आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी असतील. जीएसटीमधील सुधारणा आणि तांत्रिक पैलू, करप्रणालीतील बदल, व्यवसाय सुलभता, तंत्रज्ञान हे विषय केंद्रास्थानी असणार आहेत. जीएसटीविषयी जनजागृती करणे तसेच व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद घडवून आणणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. विशेषतः विकसित भारत संकल्पनेला अनुसरून कर प्रणालीत केलेल्या सुधारणांवर भर देणारे हे चर्चासत्र ठरेल. यासाठी विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com