क्रिकेट क्षेत्रात मुबलक संधी
rat21p4.jpg-
32357
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन शिवरूद्र टर्फ येथे करताना अविनाश साळवी. सोबत प्राची शिंदे, साळवी, राकेश नलावडे, संतोष तावडे आदी.
----------
क्रिकेट क्षेत्रात मुबलक संधी
अविनाश साळवी; क्षत्रिय मराठी प्रीमियर लीगचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : क्रिकेट खेळ सर्वांना आवडतो; पण सर्वजण क्रिकेटपटू होतील असं नाही; पण या क्षेत्रात मोठी संधी आहे. कोणी क्युरेटर होऊ शकतो, प्रशिक्षक, सहाय्यक, पंच, समालोचक, विश्लेषक होऊ शकतो. त्यामुळे युवकांनो अभ्यास करा, क्रिकेट खेळत राहा. तुम्हाला संधी मिळेल. क्रिकेट तुम्हाला मान व धन मिळवून देईल, असे प्रतिपादन मुंबई येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अॅकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी अविनाश साळवी यांनी केले.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शांतीनगरच्या शिवरूद्र टर्फ येथे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, ५३ वर्षांपूर्वी मी रत्नागिरीला क्रिकेट खेळलो त्या वेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शिर्के होते, विजय तथा अप्पा साळवी, जयसिंगराव चव्हाण असे कार्यरत होते. त्या सर्वांनी मला जिल्ह्याला खेळवले. माझ्यासोबत दीपक जाधव, अनंत सोलकर जिल्ह्यासाठी खेळत होते. आता माझी ५० ओव्हर्सची आता सेकंड इनिंग सुरू आहे.
क्षत्रिय मराठा प्रीमियर लीगचे हे पहिलेच वर्ष असून, पुरुषांचे २४ संघ व महिलांचे ४ संघ असे २८ संघ या स्पर्धेत उतरले आहेत. राकेश नलावडे, संतोष तावडे, प्राची शिंदे आदी उपस्थित होते.
२४ संघमालक व त्यांच्या क्रिकेटसंघाच्या कप्तानाला बोलवून त्यांचे स्वागत साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी शहराजवळील सुमारे दहा गावांतील क्षत्रिय मराठा खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, खेडशी, टिके, कासारवेली, पाली आदी गावातील आणि शहरी विभागातील संघ आहेत. निवेदन अमित कदम यांनी केले.
चौकट
आज बक्षीस वितरण
या स्पर्धेमध्ये पुरुष विजेता संघाला रोख रक्कम २५ हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम १५ हजार रुपये असे पारितोषिक व मॅन ऑफ दी सीरिज विजेत्याला इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. महिला विजेत्या संघाला ७ हजार ७७७ रुपये व उपविजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपये व चषक, मालिकावीर महिलेला १५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

