रत्नागिरी- आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी- आर्ट सर्कलच्या वतीने गझल गायन स्पर्धेचे आयोजन

Published on

आर्ट सर्कलच्यावतीने
गझल गायन स्पर्धा
रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असून मराठी, हिंदी किंवा उर्दू भाषेतील गझल स्वीकारली जाणार आहे. स्पर्धकांनी आपली गझल ध्वनिमुद्रित करून नाव, वय व राहण्याचे ठिकाण नमूद करत २ एप्रिलपर्यंत पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कराओके किंवा लाईव्ह कार्यक्रमातील रेकॉर्डिंग स्वीकारले जाणार नाही. तानपुरा, हार्मोनियम व तबला या वाद्यांच्या साथीनेच ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या १० स्पर्धकांची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. अंतिम फेरी २६ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार आहेत. स्पर्धेत प्रथम १० हजार रु., द्वितीय ७ हजार रु. व तृतीय ५ हजार रु. अशी पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com