रत्नागिरी ः छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे अॅस्ट्रो टर्फचे उद्घाटन

रत्नागिरी ः छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे अॅस्ट्रो टर्फचे उद्घाटन

Published on

rat23p4.jpg-
32675
रत्नागिरी ः येथील छाटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीच्या तिसऱ्या ॲस्ट्रो टर्फचे उद्घाटनप्रसंगी सत्कार करताना आमदार किरण सामंत.

छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीचे
ॲस्ट्रो टर्फचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः छत्रपती शिवाजी स्टेडियमचे मैदानालगत कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीच्या तिसऱ्या ॲस्ट्रो टर्फचे उदघाटन प्रमुख पाहुणे लांजा-राजापूर मतदार संघाचे आमदार व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत यांच्या हस्ते झाले.
या वेळी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर, उद्योजक सुरेश गुंदेचा, सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे जयू भाटकर, बिपिन बंदरकर, नगरसेवक बाळू साळवी, सौरभ मलुष्टे, पूजा पवार तसेच वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर मधुकर बोथले, सतीश साळवी आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दीपक देसाई हे रत्नागिरीतील क्रिकेटवाढीसाठी जे प्रयत्न करत आहेत व उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडवत आहेत हे कौतुकास्पद असून, त्यांच्या या कामाची दखल घेण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्याचे भाटकर यांनी सुचवले तसेच दीपक देसाई यांनी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीची माहिती सांगितली. ॲस्ट्रो टर्फसाठी उद्योजक सुरेश गुंदेचा, गजेंद्र पाथरे, राजेश खातू, किशोर भुते, सौरभ मुलुष्टे राजू, खातू यांनी मदत केली असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये १४ वर्षांखालील संघाची निवड झालेल्या ॲकॅडमीच्या आराध्य मोंडकर, वेद बाणे, स्मित घाडगे, १९ वर्षांखालील कुणाल गावडे, अफसान मिरकर, अनिष भाटकर, वेदांत पवार, किरण सुर्वे व खुल्या गटातील संघात निवड झालेल्या पार्थ गांधी, अभिषेक पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा महिला संघामध्ये १९ वर्षांखालील व खुल्या संघामध्ये निवड झालेल्या सानिया महाकाळ, दर्शना पवार, वर्षा ढवळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ॲकॅडमीतील १२ वर्षांखालील उद्योन्मुख खेळाडू सिद्धार्थ सावंत, रूद्र खातू, शिवराज नलावडे यांचाही गौरव केला. सूत्रसंचालन संजय वैशपायन यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com