‘आट्यापाट्या’त मुलींचा सुवर्णझेंडा

‘आट्यापाट्या’त मुलींचा सुवर्णझेंडा

Published on

32732

‘आट्यापाट्या’त मुलींचा सुवर्णझेंडा

कुडाळ हायस्कूल विजेते; विभागीय स्तरावर सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता, २३ : क.म.शि.प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. या संघाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी यांसारख्या दिग्गज संघांना नमवून विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. हा संघ आता धाराशिव-कळंब येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विजेत्या संघात कर्णधार लावण्या गावडे, जैलेशा तेजम, जुई चव्हाण, सृष्टी शेटकर, वैदेही कर्पे, स्वरा जाधव, शालिनी दळवी, वैभवी राणे, रोशनी कदम, दुर्वा देसाई, तनया घोगळे आणि चित्राली कुंभार या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम सामन्यात लावण्या गावडे, वैभवी राणे, जैलेशा तेजम व वैदेही कर्पे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयश्री खेचून आणली.
या खेळाडूंना प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक विजय मयेकर आणि सिद्धार्थ बावकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, उपाध्यक्ष का. आ. सामंत, सरकार्यवाह आनंद वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण, जॉईंट सेक्रेटरी महेंद्र गवस, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली, क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर, क्रीडा शिक्षक अनिल पोवार, वैभव कोंडसकर, रामचंद्र खाकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाने सर्वांचे अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com