देवगड किनारी उकाडा वाढला
देवगड किनारी
उकाडा वाढला
देवगड ः तालुक्याच्या किनारी भागातील उष्णतेत वाढ झाली आहे. दुपारच्या सुमारास कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ आता कमी झाल्याचे दिसते. कडक उन्हामुळे आंबा फळे होरपळण्याची भीतीही बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. किनारी भागातील वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. उष्णतेत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्याच्या किनारी भागातील वातावरणामधील गारवा नाहीसा होऊन कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मध्यंतरी धुके आणि दवाचे प्रमाण वाढले होते. आता वातावरण कोरडे असते. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा जाणवत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

