४ एप्रिलपासून जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबिर

४ एप्रिलपासून जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबिर

Published on

डेरवणमध्ये ४ एप्रिलपासून
जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील क्रीडाकौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत मोफत जिम्नॅस्टिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण येथील एसव्हीजेसीटी क्रीडासंकुल, डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ७ ते ८, संध्याकाळी ४:३० ते ५:३० या कालावधीत होणार आहे. यासाठी ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना सहभागी होता येईल. त्यात मुलांसाठी फ्लोअर एक्सरसाईज, पोमेल हॉर्स, स्टील रिंग्स, टेबलवोल्ट, पॅरलल बार्स आणि होरिझंटल बार यांचा समावेश आहे तसेच मुलींना फ्लोअर एक्सरसाईज, टेबलवोल्ट आणि बॅलन्सिंग बीम याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन मांडवकर यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com