टंचाई निवारणासाठी साडेआठ कोटींची तरतूद

टंचाई निवारणासाठी साडेआठ कोटींची तरतूद

Published on

33024

टंचाई निवारणासाठी साडेआठ कोटींची तरतूद
आराखडा तयार : २ गावे आणि ३२२ वाड्यांचा समावेश
नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८ कोटी ३९ लाख ९० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी दिली असून, यामध्ये जिल्ह्यातील २ गावे आणि ३२२ वाड्यांचा समावेश आहे.
यावर्षी मेपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबला असला, तरी उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच उपाययोजना आखल्या आहेत. या निधीचा विनियोग टंचाई निवारण कामांसाठी केला जाईल. यात नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती-५ कोटी ८ लाख १५ हजार रुपये (१ गाव, ५६ वाड्या), नवीन विंधन विहीर खोदणे-१ कोटी ६९ लाख ३० हजार रुपये (१ गाव, १६१ वाड्या), विहीर खोल करणे व गाळ काढणे-३६ लाख ६० हजार रुपये (५३ वाड्या), विंधन विहीर विशेष दुरुस्ती-११ लाख ६५ हजार रुपये (२८ वाड्या) अशी कामे समाविष्ट केली आहेत.

चौकट
कामाचे टप्पे असे असतील
* पहिला टप्पा - ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ असा ठरला होता. या काळात जिल्ह्यात कोठेही टंचाईची शक्यता नसल्याने कोणतीही कामे प्रस्तावित नाहीत.
* दुसरा टप्पा - जानेवारी ते मार्च असा आहे. या कालावधीसाठी ६ कोटी २२ लाख ३५ हजार रुपये मंजूर आहेत. यामध्ये मालवण, देवगड, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांतील कामांचा समावेश आहे; मात्र अद्याप टंचाईचे प्रत्यक्ष प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत.
* तिसरा टप्पा - एप्रिल ते जून असा असेल. या मुख्य टप्प्यासाठी २ कोटी १७ लाख ५५ हजार रुपये राखून ठेवले आहेत. यात १ गाव आणि २४२ वाड्यांमध्ये टंचाई भासण्याची शक्यता असून, स्थिती निर्माण होताच कामे सुरू केली जातील.

कोट
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात गंभीर पाणीटंचाई जाणवलेली नाही. जिल्हा परिषदेने बांधलेले कच्चे व वनराई बंधारे पाणी पातळी टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरत आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आणि घटती भूजल पातळी लक्षात घेता ८ कोटींचा आराखडा सज्ज ठेवला आहे.
- सुदेश राणे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com