रूपाली पाटील यांना पुरस्कार जाहीर

रूपाली पाटील यांना पुरस्कार जाहीर

Published on

​rat२४p२६.jpg -
२६O३२९५२
रुपाली पाटील

रूपाली पाटील यांना पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ : स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा मानाचा रायझिंग स्टार हा राज्यस्तरीय पुरस्कार रूपाली पाटील यांना जाहीर झाला आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
करवीर नगरी (कोल्हापूर) येथील ताराराणी विद्यापीठात व्ही. टी. पाटील सभागृहात ५ एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील कला आणि क्रीडाक्षेत्रात आपल्या कौशल्याने ठसा उमटवणाऱ्या गुणवंत कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील कलाकारांच्या गुणांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com