साखरीनाटे जेटीच्या कामाची चौकशी करा

साखरीनाटे जेटीच्या कामाची चौकशी करा

Published on

rat२४p२५.jpg-
P26O32951
राजापूर ः जेटीचे उभारलेले पिलर.
------
साखरीनाटे जेटीच्या कामाची चौकशी करा
मच्छीमार सोसायटीचे निवेदन; पिलर खचले, भरावाला भेगा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ः शासनाकडून मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीतून तालुक्यातील साखरीनाटे येथे जेटी उभारली जात आहे. त्यात उभारलेले ८ ते १० पिलर चिखलामध्ये खचले असून, जेटीच्या बांधकामाच्या सुरवातीला टाकलेल्या भरावालाही भेगा पडल्या आहेत. या कामाचे संरचनात्मक लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटीसह साखरीनाटे येथील मच्छीमारांनी केली आहे.
साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटीसह साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना जेटीविषयीचे निवेदन दिले. या वेळी मच्छीमार बांधवनेते अमजद बोरकर, मलीक गडकरी, शफी वाडकर, सादत हबीब, बांगी, नदीम तमके, तन्वीर भाटकर, शोएब म्हसकर, फैय्याज नळेकर आदींनी दिले आहेत.
धाऊलवल्ली भागाकडील फेज १ आणि साखरीनाटे भागातील फेज २चे काम सुरू असून, त्या ठिकाणी पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये कामाच्या सुरुवातीलाच धाऊलवली भागाकडील फेज १ मध्ये सुमारे ८ ते १० पिलर खचले गेले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com