बंद पडलेल्या बोअरवेल अखेर कार्यान्वित
-rat२४p२७.jpg-
26O32955
खेड ः महाडिक मोहल्ला येथील बंद अवस्थेतील बोअरवेल दुरुस्त केल्यानंतर पाहणी करताना नगराध्यक्ष माधवी बुटाला. शेजारी डावीकडून नगरसेवक सुनील दरेकर, आरिफ काझी, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, तौसिफ खोत, नीता आंब्रे आदी.
-------
बंद पडलेल्या बोअरवेल अखेर कार्यान्वित
खेड पालिका ः उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ : गेल्या अनेक वर्षांपासून नादुरूस्त आणि बंद अवस्थेत असलेल्या शहरातील बोअरवेल अखेर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात खेड शहरवासियांसाठी हा दिलासा ठरत आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. २० वर्षांपूर्वी या बोअरवेल पाडण्यात आल्या होत्या; परंतु गेली आठ-दहा वर्षे या बोअरवेल बंद स्थितीत होत्या.
खेड पालिका क्षेत्रात साधारण २० वर्षांपूर्वी १६ बोअरवेल खोदण्यात आल्या होत्या; मात्र, देखभालीअभावी त्यापैकी बहुतांश बोअरवेल गेल्या ८ ते १० वर्षांपासून पूर्णपणे बंद होत्या. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागल्याने या बोअरवेल दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत होते. या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि पालिकेचे पाणीपुरवठा कमिटीचे सभापती सतीश चिकणे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. या बंद अवस्थेतील बोअरवेल सुरू करण्यासाठी ४ लाखांचा निधी खर्ची करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आठ बोअरवेल सुस्थितीत करण्यात आल्या आहेत. उर्वरित बोअरवेलचे लवकरच काम केले जाणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाईच्या काळात नागरिकांना चांगलाच दिसाला मिळणार आहे. बोअरवेल दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल खेड पालिका प्रश्नासनाचे कौतुक शहरवासियांतून होत आहे.
----------
कोट
बहुतांश बोअरवेल तांत्रिक बिघाडामुळे गेली ८ ते १० वर्षे पूर्णपणे बंद होत्या. वारंवार मागणी होऊनही रखडलेले हे काम अखेर मार्गी लागल्याने इच्छाशक्ती असेल तर प्रश्न सुटतात.
--सतीश चिकणे, उपनगराध्यक्ष, खेड पालिका
---
शहरात सात विहिरींचीही होणार दुरुस्ती
खेड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील सात विहिरीचींही दुरुस्ती करणे व सफाई करण्याबाबत ठराव झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी दिली.

