युद्धामुळे कोकणातील तरुणांच्या नोकऱ्यांवर संकट

युद्धामुळे कोकणातील तरुणांच्या नोकऱ्यांवर संकट

Published on

कोकणातील तरुणांच्या नोकऱ्यांवर संकट
युद्ध परिस्थितीचा फटका; नातेवाइकांना पर्याय शोधण्याची विनंत्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः आखाती देशात कार्यरत असलेल्या कोकणातील नोकरदारांनाही युद्ध परिस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. आखाती देशांमध्ये कामानिमित्त गेलेले तरुण याबाबत कोकणातील आपल्या नातेवाईकांशी बोलत आहेत. गावात आल्यानंतर पर्यायी नोकरी किंवा धंदा शोधण्याची सूचना ते नातेवाइकांना करत आहेत. त्यामुळे आखाती देशातील नोकऱ्या संकटात आल्यास त्याचा फटका कोकणातून स्थलांतरित झालेल्या तरुणांना बसू शकतो, त्याची झळ कोकणातील अर्थव्यवस्थेलाही बसू शकते.
कोकणातून दरवर्षी हजारो तरुण नोकरी-व्यवसायासाठी परदेशात स्थलांतरित होतात, यात त्यांची पहिली पसंती आखाती देशांना असते. प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, कतार या देशांत कोकणातून रोजगारासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक आहे. रोजगाराच्या मुबलक संधी, चांगला मोबदला, आयकरातून मिळणारी सूट ही आखाती देशांत स्थलांतरित होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. कोकणातील जवळपास दीड ते दोन लाख नागरिक आखाती देशात नोकरी- व्यवसायानिमित्ताने स्थायिक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, खेड, चिपळूण आणि रत्नागिरीमधून आखाती देशात स्थायिक असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. आखाती देशात स्थायिक असलेले हे नागरिक आपल्या गावी कुटुंबीयांना पैसे पाठवत असतात. या पैशातून कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. युद्धपरिस्थितीमुळे आखाती देशातील रोजगार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
--------
कोट
वाढत्या महागाईमुळे आणि तेल किमतीतील चढ-उतारामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाईत घट झाली आहे. आखाती देशातील कंपन्या नवनवीन नियम व कायदे बनवत आहेत. त्यामुळे यापुढे नवीन रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. तसेच जुन्या लोकांना कामावरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- मेहबूब शेख, शिरळ, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com