राष्ट्रीय साहित्य संमेलनात कवी संतोष चिलेंची छाप

राष्ट्रीय साहित्य संमेलनात कवी संतोष चिलेंची छाप

Published on

swt2410.jpg
32990
गुजरात ः राष्ट्रीय साहित्य संमेलनात कवी संतोष चिले यांचा सन्मान करताना ज्येष्ठ कवी प्रशांत मोरे, संदीप राक्षे,  राकेश बागड व इतर.

राष्ट्रीय साहित्य संमेलनात
कवी संतोष चिलेंची छाप
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २४ ः ​‘लेखणीचा साहित्य मंच’ आयोजित गुजरात वलसाड येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात ओटवणे गावचे सुपुत्र कवी संतोष चिले यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादरीकरणाने छाप सोडली. या राष्ट्रीय संमेलनासाठी खास निमंत्रित केलेल्या संतोष चिले यांनी ‘पर्यावरण हाच नव-नारायण’ या कवितेतून निसर्ग संवर्धनाचा जागर केला. तसेच वाढते शहरीकरण आणि मानवी हव्यासामुळे होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासावर त्यांनी या कवितेतून परखड भाष्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सादर केलेल्या गीताला रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
संमेलनाच्या समारोपात संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत मोरे, संयोजक भाग्यश्री बागड, पुणे येथील प्रसिद्ध लेखक संदीप राक्षे, डॉ. चंद्रकांत कोठावदे, बाळासाहेब गिरी आदी मान्यवरांच्या हस्ते श्री. चिले यांचा विशेष गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातून मोठ्या संख्येने आलेल्या साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हे संमेलन यादगार ठरले. स्नेहभोजन आणि साहित्यावरील अनौपचारिक गप्पांनी या राष्ट्रीय साहित्य संमेलनाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com