''मराठा भवन'' हा समाजाच्या अस्मितेचा केंद्रबिंदू

''मराठा भवन'' हा समाजाच्या अस्मितेचा केंद्रबिंदू
Published on

‘मराठा भवन’साठी एकजूट गरजेची
सुभाष बने ः पराग विद्यालयात स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २५ ः ‘ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येक मराठा बांधवाने जोपासली पाहिजे. लांजा तालुका मराठा संघाने लांजा येथे ‘मराठा भवन’ उभारण्याचा जो संकल्प सोडला आहे तो याच भावनेतून पूर्णत्वास जाईल. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करावी,’ असे आवाहन माजी आमदार आणि मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाष बने यांनी केले.
मुंबईतील भांडूप येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘लांजा तालुका मराठा स्नेहमेळाव्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, कार्याध्यक्ष सुनील कुरूप, सरचिटणीस विजय पाटोळे, उपाध्यक्ष शरद चव्हाण, अविनाश (राजू) जाधव, समीर सावंत, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य संजय साळवी, ॲड. लीना जेधे, स्वप्ना सावंत, सल्लागार एकनाथ सावंत, नंदकुमार पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला लांजा तालुक्यातील मुंबईस्थित मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरचिटणीस विजय पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या ४२ वर्षांच्या प्रवासाचा आणि राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी मेळाव्याचा मुख्य उद्देश स्पष्ट केला तर सहचिटणीस प्रजाप माने यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com