विद्यार्थिनींची खानावळ बंद होण्याच्या मार्गावर

विद्यार्थिनींची खानावळ बंद होण्याच्या मार्गावर
Published on

गॅस सिलिंडर अभावी विद्यार्थिनींचे हाल
संगमेश्वरात वसतिगृहातील खानावळ, बंद होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः संगमेश्वर तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संगमेश्वर येथील विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खानावळ बंद करण्याची वेळ आली असून, त्याचा विद्यार्थिनींच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नसल्याने अनेक हॉटेलचालकांनी आपल्या मेनूमध्ये कपात केली आहे. काही ठिकाणी तर चुलीवर स्वयंपाक करून जेवण देण्याची वेळ आली आहे; मात्र वसतिगृहातील खानावळीसाठी पर्याय उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विद्यार्थिनींच्या खानावळीचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी संबंधित गॅसएजन्सीकडे वारंवार कैफियत मांडूनही अद्याप गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, खानावळ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून, पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. औद्योगिक कॅन्टीन तसेच विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील खानावळीसाठी गॅस उपलब्ध करण्याचा शासननिर्णय असताना संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या खानावळीसाठी गॅस पुरवठा केला जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com