

swt255.jpg
33213
रत्नागिरी ः सुभाष गोवेकर यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
‘कोमसाप’ ज्येष्ठ कार्यकर्ता
पुरस्कार गोवेकर यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः कोकण मराठी साहित्य परिषदेचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार कोमसापचे ज्येष्ठ सदस्य आनंद वैद्य व सावंतवाडी तालुका शाखेचे माजी अध्यक्ष सुभाष गोवेकर यांना रत्नागिरी येथे मालगुड येथील कवी केशवसुत स्मारक येथे प्रदान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोमसापचा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी मालगुंड येथे झाला. कोमसापच्या वतीने केंद्रीय कार्य करण्याच्या वतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून आदर्श साहित्यिक कार्यकर्ता निवडण्यात येतो. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ज्येष्ठ दोन कार्यकर्त्यांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. गोवेकर यांचा सन्मान कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोमसापच्या अध्यक्षा नामिता कीर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.