

- rat२५p९.jpg-
P२६O३३१९७
रत्नागिरी-युथबिल्ड फाउंडेशनतर्फे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी प्रशिक्षणात उपस्थित मान्यवर व प्रशिक्षणार्थी.
----
युथबिल्डच्या प्रशिक्षणात २४० जण सहभागी
रत्नागिरी ः युथबिल्ड फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात आयडीबीआय बँकेच्या ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी’ (सीएसआर) अंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. आदरातिथ्य, पर्यटन आणि सूक्ष्म-उद्योग या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्थानिक तरुण-तरुणी, महिला आणि इच्छुक व्यक्तींची रोजगारक्षमता व उद्योजकीय कौशल्ये वाढवणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या प्रशिक्षणात २४० प्रशिक्षणार्थींना आठ वेगवेगळ्या व्यावसायिक जॉबरोल्ससाठी प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह’, ‘होमस्टे होस्ट’, ‘रेस्टॉरंट मॅनेजर’, ‘टूर गाईड’, ‘ट्रॅव्हल कन्सल्टंट’ तसेच ‘बांबू उत्पादने निर्मिती’, ‘काजूप्रक्रिया’ आणि ‘फळप्रक्रिया’ या उद्योजकता विकास (ईडीपी) क्षेत्रांचा समावेश होता. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच साखरपा (ता. संगमेश्वर) येथे नुकताच झाला.
----
rat२५p१८.jpg-
२६O३३२४८
नगर राजभाषा समितीतर्फे आयोजित कवी संमेलनात सहभागी कवी.
----
नगर राजभाषा समितीचे कवी संमेलन उत्साहात
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात गेली २२ वर्षे हिंदी राजभाषाच्या प्रचार, प्रसाराकरिता कार्यरत असणारी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीअंतर्गत रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक कार्यालयातर्फे तृतीय हिंदी कवी संमेलन घेण्यात आले. समितीचे अध्यक्ष नरेंद्र देवरे, समादेशक शैलेश गुप्ता, कमान अधिकारी, भारतीय तटरक्षक अवस्थान, शैलेश बापट, क्षेत्रीय रेल प्रबंधक, कोकण रेल्वे संदीप कृष्णा, उपआयुक्त, सीमा शुल्क कार्यालय, डॉ. प्रा. शाहू मधाले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मोहन नुरूका, नेत्रा वाघुलदे, धनराज जाधव, दीप्ती पंडित, सुश्री गमरे, सौम्या भार्गव, अयुब खान, ललित प्रकाश, अनिल बलयान, अमृता नरसाले, कुलदीप आदींनी हिंदी कविता सादर केल्या. ललित प्रकाश तथा मधाळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत कुमार यांनी आभार मानले.
---
Rat२५p१३.jpg -
P२६O३३२०५
मंडणगड: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फिनस्पॉट इंटिग्रेटेड सर्विसेसचे व्यवस्थापकीय प्रमुख सतीश निर्मळ, सोबत इतर मान्यवर.
विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी सज्ज राहावे ः निर्मळे
मंडणगड ः विद्यार्थ्यांना एचडीबी फायनान्शिअल सर्विसेसमधील नोकरीच्या संधी, कामाचे स्वरूप, प्रशिक्षण पद्धती, वेतन व इतर सुविधांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी वित्तीय सेवाक्षेत्राचे वाढते महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक व गतिमान युगात प्लेसमेंटसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन सतीश निर्मळ यांनी केले. लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्लेसमेंट विभागामार्फत एचडीबी फायनान्शिअल सर्विसेससाठी फिनस्पॉट इंटिग्रेटेड सर्विसेस या संस्थेच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास फिनस्पॉट इंटिग्रेटेड सर्विसेसचे व्यवस्थापकीय प्रमुख सतीश निर्मळ, प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक साळुंखे उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.
----
बुरंबाड येथे आज मनाचे श्लोक स्पर्धा
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील पर्शुराम युवा मंचकडून दशक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी उद्या (ता. २६) बुरंबाड येथील राममंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता मनाचे श्लोक व मंत्रपठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला गट १ली ते ३रीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यात एक ते पंधरा श्री श्लोक सादर करावयाचे आहेत. गट दोनमध्ये ३री ते ६वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक ते पंचवीस श्री श्लोक तसेच गट तीनमध्ये ७वी ते १०वीसाठी मारूती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा राहील. मनाचे श्लोक व स्तोत्रपठण कंठस्थ असणे अनिवार्य आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रशस्तीपत्रक व श्री पर्शुराममूर्ती देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.