

- rat25p21.jpg-
P26O33257
राजापूर ः संशोधक प्राध्यापक शैलेंद्र प्रभूदेसाई, प्रकाश कोंडसकर आणि प्रणाली तळवडेकर.
- rat25p22.jpg-
26O33258
राजापूर ः संशोधित वित्तीय अंदाज उपकरण.
काही सुखद-----------लोगो
आर्थिक विश्लेषणासाठी विकसित उपकरणाला पेटंट
राजापूरच्या प्राध्यापकांना यश; वित्तीय व्यवहारांचे बांधणार अचूक अंदाज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः रयत शिक्षणसंस्थेच्या विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वित्तीय व्यवहारांचे अचूक विश्लेषण करणारे ‘आधुनिक वित्तीय अंदाज उपकरण’ विकसित केले आहे. या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडून ‘पेटंट’ म्हणून मान्यता मिळाली असून, त्याचे प्रकाशनही झाले आहे.
नावीन्यपूर्ण संशोधनामुळे साऱ्यांना वित्तीय व्यवहारांचे अचूक अंदाज, विश्लेषण व नियोजन प्रभावीपणे करणे, भविष्यातील आर्थिक घडामोडींचे भाकीत, जोखीम व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. प्राध्यापकांच्या या संशोधनामुळे प्राध्यापकांसह मराठे महाविद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. वित्तीय व्यवहारासंबंधित विश्लेषण करताना भविष्यातील जोखमींचे व्यवस्थापन कसे करता येईल, या दृष्टीने मराठे महाविद्यालयील प्राध्यापकांनी संशोधन सुरू केले होते. त्यांच्या या संशोधनाला यश येत असून, त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘वित्तीय अंदाज उपकरण’ विकसित केले. या संशोधनासाठी त्यांना महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. अतुल भावे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सदस्या संगीता पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रसाद मोहरकर, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी अभिनंदन केले आहे.
-------
चौकट
उपकरणाची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता
* बाजारातील ट्रेंड्स, शेअर्स किंवा व्यवसायातील उत्पन्न-खर्च यांचे अचूक भाकीत करण्यास मदत होते.
* गुंतवणुकीतील संभाव्य धोके आधीच ओळखून योग्य निर्णय घेण्यास सहाय्य करते.
* उद्योग किंवा कंपन्यांना आर्थिक धोरणे आखताना डाटा आधारित निर्णय घेता येतात.
* शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि पर्याय निवडण्यात मदत होते.
* कर्जवितरण, ग्राहकांचे आर्थिक वर्तन विश्लेषण आणि नफा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.