

rat२६p१०.jpg-
26O33415
राजापूर ः राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका
---
राजापूरमधील वाहनांना टोलमाफी करा
स्थानिकांची मागणी; राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका पाच वर्षानंतर पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नाक्यावर राजापूर तालुक्यातील वाहनचालकांना टोल माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे राजापूरवासियांनी निवेदनाद्वारे केली आहे. टोलमाफी न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
हातिवले टोलनाका येथील टोलमाफीविषयी निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर, राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, अरविंद लांजेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, अमोल बोळे, गिरीष करंगुटकर, राजन लाड, कोदवलीचे माजी सरपंच विलास गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. राजापूर शहरप्रमुख शासकीय कार्यालयांसह राजकीय पक्षांचे कार्यालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, बँका, पोस्ट कार्यालय, बाजारपेठा असल्यामुळे या ठिकाणी विविध कामानिमित्ताने स्थानिक नागरीक ये-जा करत असतात. काहीवेळा दिवसातून चार ते पाचवेळा फेऱ्या माराव्या लागतात. या साऱ्या वाहनचालकांना टोलनाक्यामुळे सातत्याने टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. त्यामुळे राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि टोलनाका प्रशासन आता कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
----
महामार्गासह टोलनाक्यावर अपुऱ्या सुविधा
राजापूर एसटी डेपोसमोरील भाग, वाटूळ येथे रस्ता आदी मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. महामार्गासाठी भूसंपादन झालेले अनेक शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. महामार्गाचे काम सुरू असताना टाकलेली माती यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे मार्ग बंद झाले आहेत. त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. सेवारस्ता, बसथांबे, पिकअप् शेडसारखी कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी पथदीप बंद आहेत. महामार्गालगत वृक्ष लागवड झालेली नाही. मोकाट गुरांमुळे महामार्गावर अपघात होत आहेत. त्यात वाहनचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अपघातावेळी मदतीसाठी आवश्यक रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. या बाबींकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.