आरोस-दांडेली रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

आरोस-दांडेली रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन
Published on

swt2613.jpg
33469
दांडेली : आरोस-दांडेली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य.

आरोस-दांडेली रस्त्याची
दुरुस्ती न केल्यास आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २६ : आरोस ग्रामपंचायत ते दांडेली मुख्य रस्ता या मार्गाच्या दुरवस्थेबाबत आरोस ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित विभाग आणि ठेकेदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये आरोस ग्रामपंचायत ते दांडेली मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले होते; मात्र अवघ्या दोन-तीन वर्षांतच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि उखडलेले डांबरीकरण यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाशी संपर्क साधला, परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बससह अन्य वाहने गावात येण्यास टाळाटाळ करत आहेत. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी लेखी अर्ज व विनंत्या केल्या, परंतु प्रशासनाकडून केवळ ‘‘काम लवकरच सुरू होईल’’ अशी पोकळ आश्वासने देण्यात आली. सद्य:स्थितीत रस्त्याची अवस्था इतकी भयानक आहे की, येथे कधीही मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष असून, त्यांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची देखभाल-दुरुस्ती त्वरित करून घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com