

swt2616.jpg
33471
आंबोली : येथील राघवेश्वर मठ श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात झाला.
आंबोलीत रामजन्मोत्सव सोहळा
भाविकांची गर्दी : विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २६ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोलीत आज श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील ऐतिहासिक राघवेश्वर मठ श्रीराम मंदिर आणि बाजारवाडी येथील श्रीराम मंदिर अशा दोन्ही ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा झाला.
राघवेश्वर मठ येथे उत्सवाचे औचित्य साधून कालपासूनच (ता. २५) अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रभर रंगलेल्या भजनानंतर पहाटे प.पू. श्री भारतदास महाराज यांच्या हस्ते मठात विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी बारा वाजता ''श्रीराम जन्मोत्सव'' साजरा होताच भाविकांनी ''जय श्रीराम''च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आलेले भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
बाजारवाडी येथील श्रीराम मंदिरातही परंपरेप्रमाणे जन्मोत्सव सोहळा पार पडला. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, श्रीराम जन्मोत्सवापासून हनुमान जयंतीपर्यंत दररोज सायंकाळी पालखी काढली जाते. उत्सवानिमित्त दोन्ही मंदिरांत महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. आंबोलीत सध्या २ श्रीराम मंदिरे आणि ४ हनुमान मंदिरे असून, राघवेश्वर मठात दर शनिवारी होणारी सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसाद यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आणि भाविकांचे प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनले आहे. आता भाविकांचे लक्ष आगामी हनुमान जयंती उत्सवाकडे लागले असून, दोन्ही मंदिरांत या दिवशी विशेष सोहळे होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.