कुडाळात आजपासून ''ग्रंथोत्सव''

कुडाळात आजपासून ''ग्रंथोत्सव''
Published on

swt2622.jpg
33509
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना सचिन हजारे. आनंद वैद्य, मुकुंद चिलवंत, मंगेश मस्के, राजन पांचाळ आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात आजपासून ‘ग्रंथोत्सव’
ग्रंथालय संघाचे आयोजन ः ग्रंथ प्रदर्शन-विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने २७ व २८ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ‘ग्रंथोत्सव’ निमित्त ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर तसेच विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग सचिन हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी ग्रंथालय चळवळीचे आनंद वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ उपस्थित होते. उद्या (ता. २७) सकाळी ९.३० वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी टोपीवाला वाचनालय येथून महालक्ष्मी काढण्यात येईल. याचा प्रारंभ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजता न्यू इंग्लिश स्कूल देवबाग येथील विद्यार्थ्यांचा दशावतार नाट्यप्रयोग, २ वाजता (कै.) गंगाराम गव्हाणकर यांच्या साहित्यावर चर्चा होईल. यात हेमंत पाटकर (कणकवली), प्रसाद खडपकर (वेंगुर्ले), प्रज्ञा चव्हाण (देवगड), सोनाली गोडे (कुडाळ) हे सहभागी घेणार आहेत. सायंकाळी ३ वाजता ‘श्रुतिका’ कार्यक्रमात कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, डॉ. संजीव आकेरकर व वर्षा वैद्य या सहभागी होणार आहेत.
शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता ‘आनंदयात्रा’ कार्यक्रम प्रसाद कुलकर्णी हे सादरीकरण करणार आहेत, तर दुपारी २ वाजता वाचन संस्कृती वाढ होण्यासाठी ''ग्रंथपालांची भूमिका'' विषयावर चर्चासत्र होईल. यात संजय शिंदे, ग्रंथपाल पूनम नाईक, अक्षता सावंत, सिद्धेश राहुल हे सहभाग घेणार आहेत. सायंकाळी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ''शताशीव'' ग्रंथालयांचा सन्मान होणार आहे. यात रा. ब. अनंत शिवाजी वाचनालय कुडाळ, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी, नगर वाचनालय वेंगुर्ले, रघुनाथ गणेश खटकटे ग्रंथालय शिरोडा, श्रीराम वाचनालय वेंगुर्ले, नट वाचनालय बांदा, नगर वाचन मंदिर मालवण, श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा-मालवण, श्री शिवाजी वाचन मंदिर भरड-मालवण, मालती जनार्दन जोशी वाचनालय व डॉ. विवानेने ग्रंथालय वाडी-देवगड या ग्रंथालयांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रंथालयीन कार्यकर्ते अनंत वैद्य, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीचे कार्यवाह रमेश बोंद्रे आणि रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळचे अध्यक्ष अरविंद शिरसाट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com