कुडाळात आरोग्य विभागातर्फे आशा स्वयंसेविकांचा सत्कार

कुडाळात आरोग्य विभागातर्फे आशा स्वयंसेविकांचा सत्कार
Published on

swt272.jpg
33742
कुडाळ ः आशा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सभापती मिलिंद नाईक. बाजूला उपसभापती सीताराम तेली व मान्यवर.

कुडाळात आरोग्य विभागातर्फे
आशा स्वयंसेविकांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. कविता पराडकर (वैद्यकीय अधिकारी, पणदूर), तेजू खांडेकर, रवींद्र गावडे, राघोजी चेंदवणकर, महादेव तेली, लिपिक विलास गोसावी आदी उपस्थित होते.
मिलिंद नाईक व सीताराम तेली यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यात स्वयंसेविकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या आरोग्य उन्नतीसाठी आशा स्वयंसेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचेही सांगितले.
यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्नेहा सावंत यांनी, सूत्रसंचालन प्रकाश तेंडोलकर यांनी केले. स्नेहा सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com