कविलकाटे येथील ''ग्रीन झोन हटवण्याचे आमदार राणेंना साकडे

कविलकाटे येथील ''ग्रीन झोन हटवण्याचे आमदार राणेंना साकडे
Published on

swt273.jpg
33703
कुडाळ : कविलकाटे ग्रीन झोन हटवण्याच्या मागणीचे निवेदन आमदार नीलेश राणे यांना देताना समिल जळवी.

कविलकाटे येथील ‘ग्रीन झोन’
हटवण्याचे आमदार राणेंना साकडे
समिल जळवी : प्रक्रिया करण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ : कविलकाटे येथील ‘ग्रीन झोन’ हटवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे केली. यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्याची ग्वाही राणे यांनी दिली.
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे येथील बहुतांश भाग ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे येथील विकासाला खीळ बसली असून, हा झोन उठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. जळवी यांनी आमदार राणे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. निवेदनाची दखल घेत आमदार राणे यांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कविलकाटे वॉर्ड क्र. १ मधील शेतकरी आणि नागरिकांची ‘ग्रीन झोन’ हटवण्याची मागणी प्रलंबित आहे. या महसुली गावातील जवळपास ६० टक्के जमिनीवर ग्रीन झोनचे आरक्षण असल्याने नागरिकांना हक्काचे घर बांधणे, जुन्या घराची दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज जोडणी मिळवणे, बँकांकडून कर्ज घेणे आणि नवीन घरासाठी घर नंबर मिळवणे अशा अनेक कामांत अडचणी येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊनही काहीच हालचाल न झाल्याने, जळवी यांनी आमदार राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर आमदारांनी तत्काळ नगरपंचायत कार्यालयाला भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली व हा झोन उठवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे पुढील काही महिन्यांत कविलकाटे येथील जमिनींवरील ग्रीन झोन उठून नागरिकांच्या समस्या सुटतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com