

rat२७p१२.jpg, rat२७p१३.jpg -
P२६O३३७२०
राजापूर ः गोठणे मठवाडी येथील सोमेश्वर मंदिर.
rat२७p१४.jpg-
P२६O३३७२२
राजापूर ः मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग, नंदी अन् गणेशमंदिर.
-----
सोमेश्वर मंदिर हे हिंदू शैव उपासना केंद्र
संशोधकांचा दावा; दुधाने अन् पवार यांनी गोठणे मठवाडीत केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ः तालुक्यातील गोठणे-मठवाडी येथे डोंगरकड्यात खडकात कोरलेले सोमेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात खडकात कोरलेले पादपीठ व त्यावर स्थापित शिवलिंग, समोर नंदी आणि बाजूस स्थापित गणेशमूर्ती अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आढळते. चारही बाजूंनी कातळात खोदून तयार केलेले हे सोमेश्वर मंदिर एकाश्म स्वरूपाचे असून, ते कोकणातील कैलास मंदिरच म्हणावे लागेल. या ठिकाणची भौगोलिक साधने आणि रचनेचा अभ्यास करता हे हिंदू शैव उपासना केंद्र असल्याचा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे.
इतिहास संशोधक अनिल दुधाने व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी गोठणे मठवाडी येथील सोमेश्वर मंदिराची पाहणी केली असून, त्यांच्या पाहणीत सोमेश्वर मंदिर हे एकाश्म स्वरूपाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. हे मंदिर चारही बाजूंनी कातळात खोदून तयार केलेले आहे. त्याचे कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण असून, त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा दुर्मिळ नमूना मानला जातो याशिवाय या परिसरात आणखी दोन एकाश्म रचना, कातळात कोरलेल्या पायऱ्या तसेच कातळात खोदलेली विहीरही आढळते. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
----
राजापुरातील एकाश्म मंदिरांचा इतिहास
राजापूर परिसरातील एकाश्म मंदिरांचा कालखंड साधारण इ. स. तिसरे ते सातव्या शतकादरम्यानचा असण्याचा अंदाज इतिहास संशोधकांकडून वर्तवला जत आहे. वाकाटक काळात या कलेला चालना मिळाली असून पुढे ती अधिक विकसित होत जाऊन एलोरा येथील कैलास मंदिरासारखी भव्य निर्मिती घडली असावी, असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे.
-----
कोट
राजापूर तालुक्यातील गोठणे मठवाडी येथे असणारे श्री सोमेश्वर मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, हे मंदिर वरून खाली कातळामध्ये कोरलेले एकाश्म मंदिर आहे. आजपर्यंत राजापूर परिसरात सुमारे २६ एकाश्म मंदिरे व लेणी सापडली आहेत. येथील भौगोलिक साधनांचा व रचनाचा अभ्यास करता हे हिंदू शैवउपासनेची केंद्र असल्याचे वाटते.
- अनिल दुधाने, शिलालेख वाचक व इतिहास संशोधक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.