२८ पासून मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव

२८ पासून मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव
Published on

लक्ष्मीपल्लीनाथाचा आजपासून चैत्रोत्सव
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम; तांबे कुटुंबीय करणार सेवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा ११०व्या चैत्रोत्सवाचे २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा चौदावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील विलासिनी आणि विलास तांबे कुटुंबीय करणार आहेत.
सहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरूद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि याग आदी कार्यक्रमांचाही समावेश आहे. ३ एप्रिलला पहाटे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल. २८ मार्चला दुपारी तीन वाजल्यापासून श्रींची चतुःषष्टी पूजा होईल. रात्री ९ ते १०.३० या वेळेत स्थानिक कलाकार गायनसेवा, १०.३० वाजल्यापासून स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम. २९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत २९ला सौरयाग, ३०ला रूद्र स्वाहाकार, ३१ला गणेशयाग होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम होईल. १ एप्रिलला विष्णुयाग तर २ला दत्तयाग होणार आहे. दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत मकरंदबुवा सुमंत रामदासी यांचे कीर्तन, ३ला पहाटे ४ वा. अमेयबुवा गुण्ये रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी साडेसातनंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. २९ला सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत मंत्रजागर केला जाणार आहे. २ एप्रिलला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा. रात्री ९.३० ते १२ या वेळेत प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांचा संगीतरजनी हा कार्यक्रम होणार आहे. या मैफलीला साथसंगत सुशील गद्रे- हार्मोनियम, विश्वास जोशी-तबला आणि कैलास दामले-पखवाज यांची लाभणार आहे. तसेच कीर्तनालाही साथसंगत करणार आहेत. या उत्सवकाळात याग करण्यासंदर्भात अभय देवस्थळी आणि दीपक भाट्ये यांच्याशी संपर्क साधावा तसेच, श्रींची पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये किंवा उमेश आंबर्डेकर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com