

ग्रामदैवत भैरी देवस्थानतर्फे
रत्नागिरीत आज हिंदू संमेलन
रत्नागिरी, ता. २७ : हिंदू समाजामध्ये एकता, जागरुकता आणि धर्माभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानतर्फे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ललकार हिंदू एकजुटीची! या घोषवाक्याखाली होणारे हे संमेलन शनिवारी (ता. २८) सायंकाळी ४.३० ते ६.३० या खालची आळी परिसरातील भैरव मंगल कार्यालयात होणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सध्याच्या सामाजिक परिस्थितीत धर्म, संस्कृती आणि परंपरांवर होत असलेल्या विविध आघातांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात येणार आहे. संमेलनात हिंदू समाजातील समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच धर्मांतर आणि सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समरसता श्लोक व एकात्मतेचा संदेश देणारे विचारही यावेळी मांडले जाणार आहेत. या संमेलनाचे आयोजन श्रीदेव भैरी हिंदू संमेलन समितीतर्फे करण्यात आले आहे. अध्यक्ष म्हणून रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे, तर उपाध्यक्ष म्हणून साईनाथ ऊर्फ बंधू नागवेकर कार्यरत आहेत. हिंदू समाजाने प्रत्यक्ष कृतीतून एकजूट दाखवावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.