चिपळूण-कऱ्हाड मार्ग ६० दिवस बंद

चिपळूण-कऱ्हाड मार्ग ६० दिवस बंद
Published on

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांना बंद
धांडे पूल पुनर्बांधणीसाठी निर्णय; दोन महिने आंबाघाटातील वाहतूक वाढणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : पाटण शहरातून चिपळूण-कऱ्हाड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील काँक्रिट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवारी (ता. २७) रात्री १२ वाजल्यापासून हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी ६० दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, २७ मार्च ते २७ मे या कालावधीत वाहतुकीत बदल लागू राहणार आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक कऱ्हाड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक ही कऱ्हाड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे पाचवड फाटा-उंडाळे- कोकरूड-मलकापूर-आंबाघाट-संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे वळवण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना बुधवारी जारी केली. चिपळूणकडून कऱ्हाड व उंब्रजकडे येणाऱ्या अवजड वाहतुकीमध्ये चिपळूण-संगमेश्वर-आंबाघाट-मलकापूर- कोकरूड-उंडाळे-पाचवडफाटा-राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे कऱ्हाड व उंब्रजकडे जाणार आहे. कऱ्हाड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतूक ही कऱ्हाड-उंब्रज येथून नवा रस्ता-गव्हाणवाडी फाटा-नेरळे गौंडमार्गे कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरून पुढे चिपळूणकडे जाणार आहे. तसेच चिपळूणकडून कऱ्हाड व उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहतूक ही चिपळूण-नेरळे गौंड-गव्हाणवाडी फाटा-नवा रस्तामार्गे कऱ्हाड व उंब्रजकडे वळवण्यात येणार आहे. धांडे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तसेच बाजारपेठेतील काँक्रिट रस्त्याचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे तसेच वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक ते दिशादर्शक फलकही लावण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.
---
कोयना-नेर्लेफाटा-मोरगिरी मार्गाचा वापर
चिपळूण-कऱ्हाड मार्ग बंद असताना चिपळूणमधून जाणारी हलक्या वाहतुकीची वाहने कोयनेतून धक्का-नेर्लेफाटा-मोरगिरी-पाटण या पर्यायी रस्त्याचा वापर करणार आहेत. हा रस्ता अरुंद असला तरी पूर्णपणे खड्डेमुक्त आहे. मागील पावसाळ्यात पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्यानंतर याच रस्त्याने पर्यायी वाहतूक सुरू होती. सध्या पाटणमध्ये रस्तेदुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाच्या त्रासापासून वाचण्यासाठी स्थानिक तसेच चिपळूणहून जाणारे वाहतूकदार या अंतर्गत मार्गांचा वापर करतात. पर्यायी रस्त्याने प्रवास करताना केवळ सात किमीचे अंतर वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com